कुठे नेऊन ठेवला विवेक तुमचा?
आजच्या अनिश्चिततेच्या सामाजिक, आर्थिक परिस्थिती सामान्य माणसाला असुरक्षित वाटते आहे. त्यामुळे त्याच्यात दैववादीपणा वाढत चालला आहे. आपले कोण? परके कोण? याबाबत संभ्रम वाढत चालला आहे. त्या भीतीतून सामान्य माणूस स्वतःभोवती वेगवेगळी कुंपणे तयार करायला लागला आहे. मग ती धार्मिक, जातिय, प्रादेशिक, भाषिक, आर्थिक कोणती का असेना. भीतीमुळे जे जुने, ओळखीचे आहे तेच धरून बसण्याची भावना …